Government of India Scholarship (भारत सरकार शिष्यवृत्ती)

अटी/पात्रता                            

 • वरिष्ठ व कनिष्ठ महाविदयालयातील विदयार्थी अनुसुचित जाती, अनुसुचिचत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास (OBC/SC/SBC/VJNT/ST) या प्रवर्गाचा असावा.
 • ओबीसी/ एसबीसी/ व्हीजेएनटी या प्रवर्गाकरीता उत्पन्नाची मर्यादा रु. १,००,०००/- तर अनुसुचित जाती व जमाती (SC/ ST) या प्रवर्गाकरीता उत्पन्नाची मर्यादा रु . २,००,०००/- दोन लाख पर्यंत असावी.
 • महाविदयालयाता त्या वर्षांतील उपस्थिती ही ७५ टक्के असने आवश्यक आहे.
 • एक नुकताच काढलेला फोटो.
 • प्रमाणीत केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • उत्पन्नाचा दाखला हा तहसिलदार यांचा किंवा वडील नौकरी करीत असतील तर त्यांचे वेतनाचे प्रमाणपत्र.
 • मागील वर्षी कोणत्या वर्गात प्रवेशीत होते, कोणत्या महाविदयालयात प्रवेश होता त्या सत्रातील शिष्यवृती घेतली असल्यास आदेश क्रमांक, दिनांक त्या कार्यालयातील संबंधीत अधिका-याचे सहीनिशी प्रमाणपत्र किंवा दोन्ही पैकी एकही शिष्यवृत्ती किंवा सवलत घेतली नसेल तर तसे प्रमाणपत्र.
 • जे विदयार्थी वसतीगृहात राहत असतील त्यांना वसतीगृहाचे प्रमाणपत्र.

शिष्यवृत्तीचा अर्ज www.escholorship.in या वेबसाईट वरुन ऑनलाईन भरावा.  ऑनलाईन दाख्‍ल केलेल्या अर्जाची प्रत‍ वरिल कागदपत्रे जोडून महाविदयालयात दिलेल्या तारखेत सादर करावे.

 • अल्पसंख्यांक समाजातील विदयार्थ्यांसाठी मॅट्रिको-तर शिष्यवृत्ती

अटी/पात्रता

 • कनिष्ठ किंवा वरिष्ठ महाविदयालयातील विदयार्थी हा मुस्लिम, पारशी, ख्रिश्चन, बौध्द किंवा जैन या समाजातील असावा.
 • मागील परिक्षेत ५० पेक्षा जास्त गुण असावेत.
 • पालकांचे आर्थिक उत्पन्न २ लाखापेक्षा कमी असावे.
 • वर्ग ११ वी ते पी.एचडी पर्यंतच्या विदयार्थ्यांना शिष्यवृत्ती लागू आहे.

आवश्यक कागदपत्रे

 • एक नुकताच काढलेला फोटो
 • प्रमाणीत केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • उतपन्नाचा दाखला हा तहसिलदार यांचा किंवा वडील नौकरी करीत असतील तर त्याचे वेतनाचा प्रमाणपत्रे. जर वडील हयात नसतील तर आईचा उत्पन्नाचा दाखला व वडील हयात नसल्याचे प्रमाणपत्र.
 • प्रवेशाच्या पावतीची छायांकित प्रतत्र शिष्यवृत्तीचा अर्ज National scholarship चा portal या वेबसाईट वरुन ऑनलाईन भरावा. ऑनलाईन दाखल केलेल्या अर्जाची प्रत वरील कागदपत्रे जोडून महाविदयालयात दिलेल्या तारखेत सादर करावे.
 • संबंधीत विदयार्थ्यांचे सदरन योजने अंतर्गत आर्थिक सहाय मंजूर करण्यात आल्यास त्यांना राज्य शासनाची अथवा केंद्र शासनाची दुसरी कोणतीही शिष्यवृत्ती स्विकारता येणार नाही.
 • के.श्री.शंकरराव गोविंद जोग व श्रीमती पार्वताबाई शंकरराव जोग स्मृती शिष्यवृत्ती.

 अटी/पात्रता

 • उन्हाळी माध्यमिक शालांत परिक्षेत (१२ वी) च्या पदार्थ विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विदयार्थी

गणित व भौतिकशास्त्र या विषयामधील प्रज्ञा विकासासाठी गुणवत्ता शिष्यवृत्ती

अटी/पात्रता

 • उन्हाळी माध्यमिक शालांत परिक्षेत (१२ वी) च्या पदार्थ विज्ञान विषयात सर्वाधिक गुण प्राप्त विदयार्थी
 • उन्हाळी माध्यमिक शालांत परिक्षेत (१२ वी) च्या परिक्षेत गणित / भौतिकशास्त्र या विषयामध्ये ६० टक्के पेक्षा जास्त गुण प्राप्त करणारा विदयार्थी.
 • अपंग विदयार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती.
 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • प्रमाणीत केलेले अपंग असल्याचे डॉक्टर यांचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • Single Girls child Indira Gandhi Post-Graduate Scholarship

अटी/पात्रता

 • कुटूंबाचे एकच अपत्य (मुलगी) असणे आवश्यक आहे.

आवश्यक कागदपत्र.

 • प्रमाणीत केलेली गुणपत्रिका, राशन कार्ड, महाविदयालयाच्या ओळखपत्राची छायांकीत पत्र.
 • Post-Graduater Merit scholarship scheme for University Rank Holders at Undergraduate Level.
 • जसुबाई फाऊंडेशनची विदेश स्कॉलरशीप
 • भारत सरकार Freeship सवलत

अटी/पात्रता

 • कनिष्ठ किंवा वरिष्ठ महाविदयालयातील विदयार्थी अनुसुचित जाती, अनुसुचिचत जमाती, विमुक्त जाती, भटक्या जाती जमाती इतर मागासवर्गीय व विशेष मागासप्रर्वगातील विदयार्थी ज्याचे उत्पन्न भारत सरकार शिष्यवृत्ती मध्ये बसत नाही.
 • प्रमाणीत केलेली गुणपत्रिका, राशनकार्ड, महाविदयालयाच्या ओळखपत्राची छायांकित प्रत
 • उत्‍पन्नाचा दाखला हा तहसिलदार यांचा किंवा वडील नौकरी करीत असतील तर त्यांचे वेतनाचे प्रमाणपत्र. जर वडील हयात नसतील तर आईचा उत्पननाचा दाखला व वडील हयात नसल्याचे प्रमाणपत्

शिष्यवृत्तीचा अर्ज www.escholorship.in  या वेबसाईट वरुन ऑनलाईन भरावा.  ऑनलाईन दाख्‍ल केलेल्या अर्जाची प्रत‍ वरिल कागदपत्रे जोडून महाविदयालयात दिलेल्या तारखेत सादर करावे.

 • छत्रपती राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती.
 • इयत्ता १० मध्ये ७५ टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवून इयत्ता ११ वी मध्ये प्रवेश घेणा-या विदयार्थ्यांस ही शिष्यवृतती लागू होईल.
 • कनिष्ठ महाविदयालयाती विदयार्थी अनुसुचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास (SC/ VJNT) या प्रवर्गाचा असावा.
 • प्रमाणीत केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित प्रत.
 • राज्य शासनाची खुली गुणवत्ता शिष्यवृत्ती
 • विदयार्थ्यांस इतर कुठलीही शिष्यवृत्ती मंजूर झाली असल्यास सया शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
 • विदयार्थी हा इयत्ता १२ वी मध्ये ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवून उर्त्तीण झालेला व कला, वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रवेशित असावा.

आवश्यक कागदपत्र.

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र.

विदयार्थ्याने शिष्यवृत्ती अर्ज कार्यालयातून घेवून वरील कागदपत्रे जोडून मुदतीच्या आंत महाविदयालयात सादर करावा.

 • राष्ट्रीय गुणवत्तास शिष्यवृत्ती.
 • विदयार्थी हा वर्ग ११ वी मध्ये प्रवेशीत असावा.
 • १० वी च्या गुणवत्ता यादी मध्ये त्याचे नांव असावे व त्यास बोर्डाकडूनश्‍ अर्ज प्राप्त झाला असावा.
 • विदयार्थ्यास इतर कुठलीही शिष्यवृत्ती मंजूर झाली असल्यास या शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार नाही.
 • विदयार्थी कल्याण निधी शिष्यवृत्ती

अटी/पात्रता

 • विदयाथी हा पदवी शिक्षणाच्या किेंवा पदव्यूतर शिक्षणाच्या प्रथम वर्षात प्रवेशित असावा.
 • एच.एस.सी. किंवा पदवी परिक्षेत किमान ५० टक्के गुण असावे.
 • उत्पन्नाची मर्यादा ४८,०००/-.

आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र.
 • उत्‍पन्नाचा दाखला हा तहसिलदार यांचा किंवा वडील नौकरी करीत असतील तर त्यांचे वेतनाचे प्रमाणपत्र. जर वडील हयात नसतील तर आईचा उत्पननाचा दाखला व वडील हयात नसल्याचे प्रमाणपत्.
 • जन्म तारखेचा दाखला.
 • एन.एस.एस., एन.सी.सी., सांस्कृतीक व क्रिडा क्षेत्रातील विदयार्थ्यांनी त्यासंबंधीचे प्रमाणपत्र जोडावे.
 • एकलव्य आर्थिक सहायय शिष्यवृत्ती

अटी/पात्रता

 • विदयार्थी हा पदव्यूत्तर स्तरावर शिक्षण घेणारा असावा.
 • पदवी परिक्षेत विज्ञान शाखेत किमान ७० टक्के गुण तर कला, वाणिज्य शाखेत किमान ६० टक्के असणे आवश्यक आहे.
 • वार्षिक उत्पन्न मर्यादा ७५,०००/- पेक्षा कमी असावे.

अर्ज माजी सैनिक कार्यालयामधून घेवून अर्जावर सैनिक बोर्डामधून सक्षम अधिका-याची स्वाक्षरी व शिक्का घेवून कागदपत्रे जोडून मुदतीच्या आत महाविदयालयात सादर करावे.

 • विदयार्थीनीकरीता सवलत (GIRLS FREESHIP CONCESSION)

अटी/पात्रता

 • कनिष्ठ महाविदयालयातील वर्ग ११ वी १२ वी च्या विदयार्थींनीकरिता ही सवलत लागू आहे.

आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र
 • प्रतिज्ञापत्र – अर्ज बुकस्टॉल मधून विकत घेवून कागदपत्रे जोडून मुदतीच्या आत महाविदयालयात सादर करावे.

ई.बी. सवलत

अटी/पात्रता

 • कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयातील आर्थिकदृष्टया मागासवर्गीय विदयार्थी.
 • उत्पन्नाची मर्यादा रू.१,००,०००/-

आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र.
 • शिष्यवृत्तीचा अर्ज  EBC.DHEMAHARSHTRA.IN  या वेबसाईट वरुन ऑनलाईन भरावा. ऑनलाईन दाख्‍ल केलेल्या अर्जाची प्रत‍ वरिल कागदपत्रे जोडून महाविदयालयात दिलेल्या तारखेत सादर करावे.

पी.टी.सी. सवलत (PRIMARY SCHOOL TEACHERS CONCESSION)

अटी/पात्रता

 • कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालयातील प्राथमिक शिक्षकांच्या पाल्यांना ही सवलत लागू आहे.
 • या शिष्यवृततीचा लाभ फक्त तीन अपत्य पर्यंतच देण्यात येतो.

आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र

अर्ज बुकस्टॉलवरुन विकत घेवून अर्जावर शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये नोकरीवर असल्यास सक्षम अधिका-याची स्वाक्षरी घेवून दोन प्रतीत वरिल कागदपत्रे जोडून मुदतीच्या आत महाविदयालयात सादर करावे.

 • एस.टी.सी. सवलत (MIDDLE SCHOOL TEACHERS CONCESSION)

अटी/पात्रता

 • १५ ऑगष्ट १९६८ नंतर जन्मलेल्या ४ (चौथ्या) व्‍ त्यानंतरच्या अपत्यास (मुलीसहीत) वरील सवलत देय राहणार नाही.
 • कुटूंबातील फक्त २ (दोन) अपत्यांना या योजनेचा लाभ घेता येईल.

 आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, जातीचे प्रमाणपत्राची छायांकित पत्र.

अर्ज बुकस्टॉलवरुन विकत घेवून अर्जावर शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी खाजगी किंवा सरकारी शाळेमध्ये नोकरीवर असल्यास सक्षम अधिका-याची स्वाक्षरी घेवून दोन प्रतीत वरिल कागदपत्रे जोडून मुदतीच्या आत महाविदयालयात सादर करावे.

 • माजी सैनिक सवलत

अटी/पात्रता

 • माजी सैनिकांच्या पाल्यांना ही सवलत लागू राहील.

आवश्यक कागदपत्र

 • प्रमाणित केलेली गुणपत्रिका, राशन कार्ड, महाविदयालयाच्या ओळखपत्राची छायांकित पत्र.