Ranging Prohibited
Ranging Prohibited

 1. विदयार्थ्यानी महाविदयालयाच्या व्यवस्थेसंबंधची माहिती प्रसिध्दी करीता देता कामा नये. अशा प्रकारात विदयार्थी दोषी आढळल्यास त्याचेवर शिस्तभंगाची कार्यवाही होईल.  विदयार्थ्याच्या महाविदयालयातील तसेच बाहेरील असभ्य वर्तणूकीची गंभीर दखल घेतली जाईल.
 2. महाराष्ट्र रँगीग प्रतिबंधक कायदा क्र. ३३ १५ मे १९९९ नुसार रँगिग घेण्यास सक्त मनाई आहे.
  • विदयार्थ्याचे इतर विदयार्थी/विदयार्थीनी सोबत वर्तन सभ्यतापूर्वक असावे. विदयार्थीनीची टिंगल व कोणतेही असभ्य करु नये तसेच विदयार्थी/विदयार्थींनीची रँगिग घेवून कोणत्याही प्रकारचा त्रास देवू नये.  अन्यथा शासकीय नियमाप्रमाणे कडे कार्यवाहीस पात्र राहील.

Ragging means display of disorderly conduct, doing of any act which causes or is likely to cause physical or psychological harm or raise apprehensions of fear of shame or embarrassment to a student is any educational institution and includes I Teasing, abusing, threatening or play practical jokes on, or cause hurt to such student or (ii) asking a student to do any act or perform something which such student will not in the ordinary course, willingly do.

 1. अशा प्रकारात विदयार्थी दोषी आढळल्यास त्याचेवर निलंबनाची कार्यवाही होवू शकते.
 2. रैंगिग घेणा-या विदयार्थ्यांचे नांव शासकिय नियम १५ May १९९९, कलम ४ नुसार महाविदयालयाच्या पटावरुन काढून टाकण्यात येईल व त्या विदयार्थ्याला कार्यवाहीच्या दिनांकापासून पाच वर्षापर्यंत इतर कोणत्याही शैक्षणिक संस्थेमध्ये प्रवेश मिळणार नाही.
 3. विदयार्थी महाविदयालयाच्या परिसरात किंवा महाविदयालयाच्या बाहेरील इतर शैक्षणिक संस्थामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रैंगिंग घेतांना किंवा त्यामध्ये सहभाग असल्याचे आढळल्यास त्याला शासकिय नियमानुसार दोन वर्ष तुरुंगवास किंवा रु. १०,००० दंड होवू शकतो.
 4. महाविदयालयाच्या प्रवेश्‍ घेतल्यानंतर विदयार्थ्याने लगेच महाविदयालय सोडले तर त्यांना पूर्ण सत्राचे शुल्क भरावे लागेल.
 5. विदयार्थ्याने प्राचार्यांच्या आज्ञेचे पालन करावे. प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेशी सभ्यतेने व नम्रतेने वागावे.  त्यांची अवज्ञा करु नये तसे केल्यास ती गैरशिस्त समजून तो विदयार्थी कडक कार्यवाहीस पात्र राहील.  बेशिस्त, अनुपस्थितीत व इतर कोणत्याही कारणावरुन विदयार्थ्याचे नाव महाविदयालयाच्या पटावरुन काढून टाकण्याचा अधिकार प्राचार्यांना आहे.  या बाबतीत प्राचार्यांचा निर्णय अंतिम राहील.
 6. प्राचार्यांच्या परवानगीशिवाय महाविदयालयाच्या आवारात कसल्याही प्रकारची निदर्शने, सभा किंवा इतर कोणताही कार्यक्रम घेता कामा नये तसेच भितीपत्रके, प्रतिमा लावता येणार नाही. असे आढल्यास कडक कार्यवाही करण्यात येईल.
 7. कोणत्याही प्रकारचे प्रमाणपत्र पूर्ण सत्राची फी भरल्याशिवाय मिळणार नाही. तसेच महाविदयालयात प्रवेश घेतांना भरलेली फी कोणत्याही सबबीवर परत मिळणार नाही.
 8. महाविदयालयाने दिलेले ओळखपत्र नेहमी सोबत ठेवावे. ओळखपत्राशिवाय महाविदयालय व ग्रंथालयात प्रवेश करु नये तसेच परिसरात फिरु नये.
 9. महाविदयालयाच्या सर्व परिक्षा अनिवार्य आहेत. प्रत्येक विषयात २० टक्केपेक्षा जास्त गुण मिळविणे आवश्यक आहे.  यापेक्षा कमी गुण प्राप्त झाल्यास दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
 10. प्रत्येक विदयार्थ्याने नियमित व वक्तशीर असावे. त्याची उपस्थिती ७५ टक्के पेक्षा अधिक असावी.  वैदयकिय किंवा इतर कारणामुळे गैरहजर राहणे आवश्यक असेल तर पूर्व परवानगी घेणे आपश्यक आहे.
 11. महाविदयालयाच्या प्रांगणात धुम्रपान करणे, पान खाने, गुटखा चघळणे यास सक्त मनाई आहे. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
 12. महाविदयालयाच्या प्रांगणात सोबत मोबाईल (भ्रमणध्वनी) आणण्यास सक्त मनाई आहे. अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
 13. विदयापीठ नियमानुसार प्रत्येक विदयार्थ्यांला शारिरिक क्षमता चाचणी व वैदयकीय तपासणीसाठी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. गैरहजर विदयार्थ्यांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल.
 14. महाविदयालयातील सर्व विदयार्थी व विदयार्थीनींना ड्रेसकोड (Uniform) लागू राहील.
 1. सर्व विदयार्थ्यांना प्रवेश घेतेवेळी महाविदयालयाने निश्चित केलेल्या युनिफॉर्मसाठी विदयार्थी ग्राहक भांडारातून कापड घेणे आवश्यक राहील.
 2. युनिफॉर्म स्वच्छतेसाठी बुधवार हा दिवस युनिफॉर्मकरीता सूट दिवस राहील.